Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घरफोडी करून फरार चोरट्याला चाळीसगाव तालुक्यातून अटक

अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथे घरफोडी करणाऱ्या संशयित फरार परप्रांतीय चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफिने चाळीसगाव तालुक्यातील टाकळी गावातून शुक्रवारी २८ जून रोजी सायंकाळी ६ वाजता अटक केली आहे. त्याला पुढील कार्यवाहीकामी अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथे ५ महिन्यांपूर्वी घरफोडी झाली होती. या घरफोडीतील संशयित आरोपी किरण तुकाराम बारेला ((सोलंकी) वय २७, मूळ रा. दुदखेडा ता. सेंधवा जि. बडवानी, हल्ली मु. टाकळी प्र. दे. ता. चाळीसगाव) हा फरार झाला होता. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला फरार आरोपीला अटक करण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी त्यांचे पथक तयार केले होते. या पथकाने चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथे जाऊन सदर संशयित आरोपीला शिताफिने ताब्यात घेऊन अटक केली.

त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पाच महिन्यापूर्वी सावखेडा गावी चोरी केल्याची कबुली त्याने दिली आहे पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.

Exit mobile version