भोंग्याचे नियम पायदळी : दोन मशिदीवर कारवाई

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – राज्यात ४ मे नंतर भोंग्याविरोधात राज्य सरकार देखील सतर्क झाले असून सुमारे ८५० च्यावर मशिदीवरील भोंग्याना परवानगी देण्यात आली. तर काहीना शांतता क्षेत्र असल्याने परवानगी नाकारली आहे. त्यात आज भोंग्यांच्या संदर्भात दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन मशिदीच्या व्यवस्थापनावर कारवाई करण्यात आली.

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी भोंगे लाउडस्पीकर संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात ४ मे नंतर मुंबईतील तीन हजाराहून अधिक मशिदीपैकी अनेक मशिदींना लाउडस्पीकरची परवानगी देण्यात आली आहे. तसेच शांतता परिक्षेत्रात असलेल्या मशिदींना लाउडस्पीकरची परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच सकाळी ६ ते रात्री १० वाजेदरम्यान निश्चित केलेल्या ध्वनीमर्यादेचे पालन करण्याचे आदेश आहेत.

असे असले तरी मुंबईतील वांद्रे परिसरात नुरानी मशिद तसेच सांताक्रूझ येथील कब्रस्तान मशिद व्यवस्थापनाने लाउडस्पीकर ध्वनीमर्यादेचे पालन केले नाही त्यामुळे या दोन्ही मशिदीवर मुंबई पोलिसांनी भादवि कलम आणि मुंबई पोलीस कलम ३७ (१).(३) नुसार ध्वनी प्रतिबंधक कलम ३३ र (३) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Protected Content