Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बुमराहला पॉली उम्रीगर पुरस्कार जाहीर

Jasprit Bumrah

मुंबई प्रतिनिधी । भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला प्रतिष्ठेचा पॉली उम्रीगर पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याबाबत रविवारी घोषणा केली आहे.

आयसीसीच्या वनडे क्रमवारीतील अव्वल गोलंदाज बुमराहने जानेवारी २०१८मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पदार्पण केले होते. त्याने आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, आणि वेस्ट इंडिज संघांविरुद्ध प्रत्येकी ५ विकेट घेण्याची कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा तो पहिला आणि एकमेव आशियाई गोलंदाज ठरला आहे. बुमराहने एक ऑक्टोबर २०१८ ते ३० सप्टेंबर २०१९ या काळात ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या ६ कसोटी सामन्यांमध्ये ३४ विकेट घेतल्या. तर १७ वनडेत ३१ विकेट आणि ७ टी-२० सामन्यात ८ विकेट घेतल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. भारतीय संघाने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया संघाचा त्यांच्याच देशात कसोटी मालिकेत पराभव केला होता. भारताच्या या विजयात बुमराहचा महत्त्वाचा वाटा होता. पुरुषांच्या विभागात बुमराहला सर्वोच्च पुरस्कार मिळाला तर महिला क्रिकेटपटूंमध्ये पुनम यादवने सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला.

Exit mobile version