Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

इर्शाळवाडीच्या आपत्तीग्रस्तांना बुलढाणा अर्बनचा मदतीचा हात

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | इर्शाळवाडी येथील आपत्तीग्रस्तांसाठी बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीने मदतीचा हात पुढे केला आहे.

 

रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला असून अजूनही अनेक जण गाडल्या गेल्याची भीती आहे. अतिशय दुर्गम अशा या भागात कुठलेही यांत्रिक मदत होत नसल्याने बुलढाणा अर्बन चारिटेबल सोसायटीने प्रशिक्षित स्वयंसेवकासह मदत साहित्य बुलढाण्याहून रवाना करण्यात आले आहे .यात ब्लँकेट्स रेनकोट औषधी शुद्ध पाणी व रुग्णवाहिका वाडी येथील नागरिकांसाठी मदत म्हणून पाठवला आहे.

 

बुलढाणा अर्बन सहकारी संस्थेने कायम सामाजिक बांधिलकी जोपासली असून समाजसेवेचा एक नवीन मापदंड प्रस्थापित केला आहे. यातच इर्शाळवाडीत दुर्घटना घडल्याने फाऊंडेशनच्या मदतीने आपत्तीग्रस्तांना या माध्यमातून मदत रवाना करण्यात आली आहे.

Exit mobile version