Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुस्साट ! सेन्सेक्सची ४१ हजाराला पुन्हा गवसणी

share market

 

मुंबई प्रतिनिधी । सेन्सेक्स आणि निफ्टी बुधवारी जोरदार वधारला असून गुंतवणूकदारांनी तेजी दाखविली. बाजार उघडल्यानंतर सकारात्मक सुरुवात झालेल्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १७० अंकांनी वधारला असून त्याने ४१ हजार ५०० अंकांचा निर्णायक टप्पा पार केला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५० अंकाच्या वाढीसह १२ हजार २०० अंकावर आहे.

बाजारात ऑटो, मेटल,टेक, फायनान्स या क्षेत्रात खरेदी सुरु आहे.पिरामल एन्टरप्राइज, मारुती सुझुकी, एनबीसीसी, आयआरबी इन्फ्रा, आरकॉम, डीएचएफएल, येस बँक या शेअरमध्ये सर्वाधिक व्यवहार झाले. एमएमटीसी, जिंदाल स्टील, एचडीएफसी बँक, विप्रो या शेअरमध्ये वाढ झाली.

Exit mobile version