Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विविध मागण्यांसाठी बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे निदर्शने (व्हिडिओ )

जळगाव राहूल शिरसाळे । वेळेवर वेतन मिळण्यासह अन्य विविध मागण्यांसाठी आज बीएसएनएलच्या कर्मचार्‍यांनी महाप्रबंधक कार्यालय येथे जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केलीत. 

आंदोलकांनी केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करत त्यांचे वेतन वेळेवर मिळावे अशी मागणी केली आहे.  आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करतांना एयुएबीचे संयोजक निलेश काळे यांनी सांगितले की,  डिसेंबर २०२० मध्ये व्हीआरएस स्कीम आणली गेली आहे.  वर्षभरापासून कर्मचाऱ्यांना त्रास देण्यास सुरुवात करण्यात आली असल्याचा आरोप श्री. काळे यांनी केला.  यात बीएसएनएलच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना वेळेवर वेतन नाही, मागील आठ महिन्यांपासून डीए गोठविण्यात आला आहे. मागील दीड वर्षात ८० हजार कर्मचाऱ्यांनी व्हीआरएस घेतल्याने केवळ वेतनावरील ५० टक्के पेक्षा अधिक भार कमी झालेला असतांना प्रशासन वेळेवर पगार करत नाही. पुढे दर महिन्याचे वेतन वेळेवर मिळेल याची हमी देण्यात यावी. मार्केटमध्ये ५ जी येणार असतांना बीएसएनएलला ३ जीवर चालत आहे. आम्हाला ४ जी  स्प्रेक्ट्रम देण्यात आले तर आम्ही स्पर्धेत चांगल्याप्रकारे टिकू शकू अशी अपेक्षा श्री. काळे यांनी व्यक्त केली.  डीओटीकडे बीएसएनएलचे करोडे रुपये घेणे आहे त्वरित देण्यात यावेत आदी मागण्या करण्यात आल्या. हे आंदोलन  निलेश काळे, सचिन झाल्टे, बी. पी. सैदाणे, चेतन जाधव, एस. बी. कासार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यशस्वीतेसाठी शशिकांत सोनवणे, शालिक पाटील, प्रदीप चांगरे, अभिजित पाटील, विकास बोंडे, विलास डीकोंडा, अकिल शेख यांच्यासह सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

 

 

Exit mobile version