Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईनगरात बंद घर फोडून मुद्देमाल लांबविला; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । मुक्ताईनगरात एकाच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी, लॅपटॉप, होम थिएटर आणि रोकड असा एकुण २३ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे .याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप धनसिंग पाटील (वय-४८) रा. मुक्ताईनगर बंधु जळगाव हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. दिलीप पाटील हे १४ फेब्रुवारी रोजी कामाच्या निमित्ताने घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घराचे कुलूप तोडून घरातील लॅपटॉप, होम थीएटर, बाहेर लावलेली दुचाकी (एमएच १९ एटी २९०८) आणि रोकड असा एकुण २३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याचे उघडकीला आले. याबाबत दिलीप पाटील यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ तुषार जावरे करीत आहे.

Exit mobile version