आवश्यक ते बहुमत आणा आणि मुख्यमंत्री बनवा ! – अजित पवार

मुंबई लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – महाराष्ट्रात राज्याचा मुख्यमंत्री होण्यासाठी किमान १४४ आमदारांचे समर्थन आवश्यक आहे. तेवढे आमदार तुमच्या पाठीशी उभे राहिले तर तुम्हीच काय दुसऱ्या कोणालाही मुख्यमंत्री बनवू शकता, अशी टीका उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर  केली.

गेल्या अडीच वर्षापासून राज्यात काहीना काही कारणाने महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एका ब्राम्हणाला राज्याचा मुख्यमंत्री झालेले पहायचे आहे, असे परशुराम जयंती निमित्त जालना येथिल एका कार्यक्रमात भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी वक्त्यव्य केले होते.

यावर मुख्यमंत्री तर तुम्हीसुद्धा होऊ शकता, किंवा कोणत्याही जात धर्माचाच काय, तृतीय पंथाचा देखील मुख्यमंत्री होऊ शकतो, पाहिजे फक्त १४५ आमदाराचे पाठबळ, ते तुमच्या पक्षाने उभे केले तर तुम्ही सांगाल ती व्यक्ती मुख्यमंत्री होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या दानवे यांच्या वक्त्यव्यावर टीका केली आहे.

Protected Content