Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेंदूर्णीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला उजाळा

शेंदूर्णी प्रतिनिधी । शेंदूर्णी येथे शिवसेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून यांच्या त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले.

 

शिवसेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात जेष्ठ शिवसैनिक व हभप जिभाऊ पाटील, हभप माऊली पाटील, हभप युवराज बारी, संतोष माळी, अशोक बारी, राजू पाटील यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुनील अग्रवाल शिवसेना उपतालुकाप्रमुख यांनी केले. शेंदूर्णी शहरप्रमुख भैय्याभाऊ गुजर यांनी आभार मानले यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित शिवसैनिकांनी यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Exit mobile version