Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कापडणे येथील वैदयकीय अधिकारी डॉ. जयश्री ठाकुर यांच्याविरुद्ध लाचप्रकरणी गुन्हा दाखल

179738 bribe

जळगाव (प्रतिनिधी) धुळे जिल्ह्यातील कापडणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवानिवृत्त अॅब्युलन्स वाहन चालकाला त्याची मंजूर असलेली प्रवासभत्ता व ओवर टाइमची रक्कम देण्याच्या मोबदल्यात ५००० हजार रुपयांची लाच मध्यस्थामार्फत स्वीकारल्याबद्दल केंद्राच्या वैदयकीय अधिकारी डॉ.श्रीमती जयश्री ठाणसिंग ठाकुर यांच्याविरुद्ध आज (दि.३०) सोनगीर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, डॉ. ठाकूर यांनी आधी संबंधित वाहन चालकाकडे ७००० रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीनंतर त्यांनी ५००० रुपये एवढी रक्कम ठरवली. या संदर्भात तक्रारदार यांनी दि.२८ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे तकार नोंदवली होती. त्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचून डॉ. ठाकुर यांच्यावतीने रक्कम घेताना परिचर दिलीप देवराम निकुंभे यांना रंगेहात अटक केली. ही कारवाई पोलीस उप अधीक्षक सुनिल कुराडे, पोलीस
निरीक्षक महेश भोरटेकर व त्यांच्या पथकातील पो.हे.कॉ.जयंत साळवे, पो.ना. संतोष हिरे, संदीप सरग,सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडीले, भुषण खलाणेकर, प्रशांत चौधरी, कैलास जोहरे, प्रकाश सोनार, शरद काटके, संदीप कदम, सुधीर मोरे यांनी केली.

Exit mobile version