Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

Breking : भरधाव आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; पिंपळकोठा जवळील घटना

एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील पिंपळकोठा येथे भरधाव आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना दुपारी घडली. एकलता एक मुलगा गेल्याने कुटुंबियांनी मनहेलवणारा आक्रोश केला होता.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवम बाप्पू हटकर (वय-२२) रा. पिंपळकोठा ता.एरंडोल हा दुचाकी (एमएच १९ डीजे १२०४) मध्ये पेट्रोल भरण्यासाठी पिंपळकोठा गावाहून जळगावकडे असलेल्या एका पेट्रोल पंपावर गेला. दुपारी ३.३० वाजता पेट्रोल भरून पुन्हा गावात परतत असताना पिंपळकोठा गावाजवळ भरधाव आयशर क्रमांक (एमएच ४८ एवाय ४९५१) याने जोरदार धडक दिली. या धडकेत शुभम हटकर हा जागीच ठार झाला आहे. तर दुचाकीही चक्काचूर झाली आहे. ही घटना कळताच पिंपळकोठा येथील गावातील नागरिकांनी धाव घेऊन गर्दी केली होती. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एरंडोल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी यांनी धाव घेऊन थांबलेली वाहतूक सुरळीत केली आहे. कुटुंबातील एकुलता एक मुलगा गेल्याने नातवाईकांनी एकच आक्रोश केला होता.

Exit mobile version