Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकिंग : नरेंद्र दाभोळकरांच्या खुन्यांना साक्षीदाराने ओळखलं

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाचा आरोप असलेल्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखले आहे.

दाभोळकर यांच्यावर अंदुरे आणि कळस्कर या दोघांनी गोळीबार केला आणि ते पळून गेल्याचं या साक्षीदाराने सांगितलं आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या बाजूला असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सकाळच्या सुमारास गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी त्या पुलावर साफ सफार्इ करणारा एक पुरुष आणि महिला पुलाच्या दुभाजकावर बसले होते. साक्षीदार तिकडे पाहत असताना, एका व्यक्तीला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एकाला गोळ्या झाडल्या. त्यानंतर ती व्यक्ती काही क्षणात खाली पडली. तेथून हल्लेखोर जवळच असलेल्या पोलीस चौकीच्या बाजूला पळाले. त्यानंतर दुचाकीवरून पसार झाले.

या घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या,व्यक्तीला पाहिले. त्यानंतर आम्ही आमच्या साफसफाई कामासाठी निघून गेलो, अंदुरे आणि कळसकर यांनीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचे साक्षीदाराने न्यायालयामध्ये सांगितले. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली असून आता पुढील सुनावणी 23 मार्च रोजी होणार आहे. तसेच विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी तर डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या कुटुंबीयांच्या वतीने ॲड.ओंकार नेवगी यांनी कामकाज पाहिले आहे. बचाव पक्षाकडून विरेंद्र इचलकरंजीकर यांनी काम पाहिले

 

Exit mobile version