Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग : एरंडोलजवळ कार-कंटनेरच्या भीषण अपघातात दोन जागीच ठार; पाच जखमी

एरंडोल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । एरंडोल शहरापासून हाकेच्या अंतरावरील ऑईल मिललगत राष्ट्रीय महामार्गावर कार आणि कंटेनर यांच्या झालेल्या भीषण अपघातात दोनजण जागीच ठार झाले तर इतर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ‘जळगाव येथील व्यावसायीक नरेंद्र जैन हे एम.एच.१९ सी.व्ही. ७७१७ क्रमांकाच्या वाहनाने बोरकुंड ता.जि.धुळे येथे ‘रामदेव ग्यारस, निमित्त आपल्या कुटुंबियांसह देवदर्शनास गेले व परतीच्या प्रवासात असताना समोरून येणार्या एम.एच.४६ बी.बी. ८५३२ क्रमांकाच्या मालवाहू कंटेनर ने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत नरेंद्र जैन यांची आई कमलाबाई न्याहलचंद बम-वय वय- ६५ वर्षे, व त्यांचे मामा प्रकाशचंद राजमल बागरेचा वय ७४ वर्षे हे दोघे जागीच ठार झाले.

कार चालक नरेंद्र जैन, योगीता जैन, मुलगी लभोनी, मुलगा नमन व नातेवाईक विजय जैन हे जखमी झाले आहे. ही घटना शनिवार १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीसांनी धाव घेवून माहिती घेण्यात येत होती.
अपघातात जखमी झालेल्या कारमधील व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे – योगीता नरेंद्र जैन, नरेंद्र जैन (वय-४८), नमन नरेंद्र जैन, विजय शांतीलाल जैन, लभोनी नरेंद्र जैन, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, अनिल पाटील, जुबेर खाटीक, मिलींद कुमावत, काशिनाथ पाटील,पंकज पाटील आदी कर्मचारी व शहरातील किशोर निंबाळकर, सुनील मराठे, डॉ.राजेंद्र चौधरी, राकेश चौधरी, बापू चौधरी, कृष्णा धनगर, बाळा पहेलवान, अजेंद्र पाटील आदी. नागरीकांनी मदतकार्य केले.

एरंडोल ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ.कैलास पाटील यांनी जखमींवर प्रथमोपचार केले व गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले. जखमी लभोनी नरेंद्र जैन वय-१७ वर्षे, नमन नरेंद्र जैन वय-१५ वर्षे, नरेंद्र न्याहलचंद जैन वय-४९ हे एरंडोल येथील एका खाजगी रूग्णालयात तर विजय शांतीलाल जैन वय-५९ व विशाखा नरेंद्र जैन वय-१२ वर्षे हे जळगाव येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहेत.

Exit mobile version