Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

Breaking : सैनिकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली !

श्रीनगर-वृत्तसंस्था | सैनिकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळल्याची मोठी दुर्घटना आज घडली आहे.

जम्मू-काश्मिरात आयटीबीपी म्हणजेच इंडो-तिबेटीयन बॉर्डर फोर्सच्या जवानांच्या बसला मोठा अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या बसमध्ये आयटीबीपीची ३७ जवान आणि जम्मू-काश्मिरचे दोन पोलीस प्रवास करत होते. पहलगाव जवळ एका खोल दरीत ही बस कोसळली आहे.

या संदर्भात प्राप्त झालेल्या माहितीनुसार, यात चार जवानांचा मृत्यू झाला असून सर्व जण जखमी झाले आहेत. यात अनेक सैनिक जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढल्याची भिती आहे. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती समोर आलेली नाही. तर, याची माहिती मिळताच सैन्यदलाने येथे धाव घेत जखमी सैनिकांना तेथून काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

 

Exit mobile version