Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

Breaking : डोक्यात काठी मारताच एकाचा जागेवरच मृत्यू; वरणगावात खळबळ

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  वरणगाव फॅक्टरीच्या आवारात वडापाव खात असतांना दोघांमध्ये मजाक मस्करीतून झालेल्या वादात एकाने डोक्यात काठी मारताचा घाव वर्मीत लागताच ५८ वर्षीय प्रौढाचा जागेवरच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना रविवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. प्रमोद ज्ञानेश्वर महाजन (वय-५५ रा. टाकळी ता.भुसावळ ह.मु. सिध्देश्वर नगर, वरणगाव)  असे मयत झालेल्या प्रौढाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील सिध्देश्वर नगरात  प्रमोद महाजन हे प्रौढ व्यक्ती आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात नोकरीला होते.  रविवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास वरणगाव फॅक्टरी आवारातील सुशील नगर सर्कल जवळ त्याचा मित्र दिपकसिंग (वय-५० रा. वरणगाव फॅक्टरी) याच्या सोबत वडापाव खात बसले होते. या दोघांमध्ये गप्पा मारत असतांना मजाक मस्करीला सुरूवात झाली त्यानंतर दिपकसिंगने जवळ असलेली काठी प्रमोद महाजन यांच्या कपाळावर मारली. यात काठीचा जोराचा फटका डोक्यावर मारताच घाव वर्मीत लागला आणि त्यातच त्यांची जागेवर मृत्यू झाला.

दरम्यान, परिसरातील उभे असलेल्या नागरीकांच्या लक्षात आल्यानंतर प्रमोद महाजन यांना तातडीने वरणगाव ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. या तपासणी अंती वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. वरणगाव पोलीसांनी संशयित  दिपक सिंग याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. घटना घडल्यानंतर डीवायएसी राजकुमार शिंदे, वरणगाव पोलीस ठाण्यात सपोनि आशिष अडसुळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीसात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.

Exit mobile version