Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग न्यूज : घरगुती गॅस सिलेंडर फुटल्याने तीन घरांना भीषण आग; कुटुंबाचा आक्रोश !

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा गावात गॅस सिलेंडर फुटल्याने लागलेल्या भीषण आगीत तीन घरे जळून खाक झाल्याची घटना सोमवारी १८ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. या घरात असलेले संसार उपयोगी वस्तू, कपडे, महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम असा मुद्देमाला जळून खाक झाला आहे. या आगीमुळे तीनही कुटुंब उघड्यावर आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील मनारखेडे गावात एका पत्र्याच्या घरात घरगुती गॅस सिलेंडर फुटल्याने लागलेल्या भीषण आगीत तीन घरे जळून खाक झाल्याची घटना सोमवारी १८ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता घडली. घरे जळालेल्या तीन कुटुंबांचे नावे असून समोर आलेले नाही. त्यामुळे तीनही कुटुंबातील संसार उघड्यावर आला आहे. स्वयंपाक केल्यानंतर नवीन सिलेंडर लावले होते, त्यावरून ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तीनही घरे बंद करून कुटुंब कामानिमित्त बाहेर निघून गेलेली होती त्यामुळे सुदैवाने यात कुणाला दुखापत झालेली नाही. दरम्यान महानगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल होऊन ही आग विझवण्यात आली. याआगीत घरातील संसारोपयोगी वस्तू, महात्वाची कागदपत्रे, कपडे, आणि रोख रक्कम जळून खाक झाल्याचे समोर आले आहे. मन्यारखेडा येथे आग लागल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी तिनही कुटुंबासाठी स्वयंपाकासाठी लागणारे सामान, आणि भांडी उपलब्ध करून दिले आहे. याप्रसंगी सरपंच राजू पाटील, शिवराज पाटील, पिंटू पाटील, गणेश कोळी यांनी सहकार्य केले. या संदर्भात पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

Exit mobile version