Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग न्यूज : गांजाची शेती करणे पडले महागात; ९८० किलो गांजा जप्त !

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।

चोपडा तालुक्यातील मेलाणे गावातील शेतात गांजाची शेती करणाऱ्या मुख्य संशयित आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी १२ मार्च रोजी दुपारी ४ वाजता अटक केली आहे. त्याच्याकडून ४४ लाख १० हजार रुपये किमतीचे ९८० किलो वजनाचे हिरवे गांजाचे झाडे जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन सुमाऱ्या पावरा वय-४५ रा. मेलाणे ता. चोपडा असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील मेलाणे येथे राहणाऱ्या अर्जुन सुमाऱ्या पावरा शासनाने उपजीविकेसाठी शेत जमीन दिलेली होती. या शेतात मका लावून त्यात गांजाची पीक घेत असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवारी १२ मार्च रोजी दुपारी ४ वाजता पथकासह पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४४ लाख १० हजार रुपये किमतीचे ९८० किलो वजनाचे गांजाची झाडे आढळून आले. दरम्यान पोलिसांनी ही सर्व झाडे उपटून जप्त केले आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अर्जुन सुमऱ्या पावरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला चोपडा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन वरे हे करीत आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, वन विभागाचे अधिकारी कमल ढेकले, नायब तहसीलदार रवींद्र महाजन यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि अमोल मोरे, सहायक फौजदार युनूस शेख, पोहेकॉ सुनील दामोदरे संदीप पाटील, गोरख बागुल, प्रवीण मांडोळे, नंदलाल पाटील, दर्शन ढाकणे, अशोक पाटील, बबन पाटील, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रजनी माळी, रूपाली खरे यांच्यासह पथकाने कारवाई केली आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला चोपडा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Exit mobile version