Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग न्यूज : धारदार शस्त्राने तरूणाचा निर्घृण खून !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील भगवान साळवे नगर जवळील रेल्वे प्रशिक्षण केंद्र अर्थात झेडआरटीसी जवळील काटेरी झुडूपाजवळ एका तरूणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याचा धक्कादायक घटना शनिवारी १३ जानेवारी रोजी दुपारी  १ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावेश अनिल भालेराव वय-२६ (रा. भगवान साळवे नगर, फेकरी ता. भुसावळ) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील भगवान साळवे नगर येथे भावेश भालेराव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. भावेश सोबत काही तरूणांचा किरकोळ कारणावरून वाद झालेला होता. या वादातून त्याच्या मानेवर डोक्यावर सपासप वार करून निर्घृण खून केला. हा प्रकार शनिवारी १३ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता त्यांचा मृतदेह  फेकरी येथील भगवान साळवे नगर जवळील रेल्वे प्रशिक्षण केंद्र अर्थात झेडआरटीसी जवळील काटेरी झुडूपाजवळ आढळून आला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भुसावळ तालुका पोलीसांनी धाव घेतली. यावेळी पुर्ववैमनस्शेतून हा खून केला असावा असा अंदाज पोलीसांनी केला आहे.

याठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पिंगळे, पोलीस निरीक्षक बबन जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, संजय तायडे,वाल्मिक सोनवणे, प्रेम सपकाळे, श्यामकांत मोरे अशांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधिकाऱ्यांनी सदरील घटनास्थळी ठसे तज्ञांना तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून खुनाच्या घटनेचा कसून तपास सुरू आहेत. मयत भावेश भालेराव यांचे शवविच्छेदन नांसाठी ट्रामा केअर सेंटर मध्ये हलविण्यात आले आहे. या घटनेबाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

 

Exit mobile version