Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग : किरीट सोमय्यांना मोठी जखम नाही

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीनंतर त्यांनी जखमी झाल्याबद्दल आरोप केले असतांना रूग्णालयाच्या तपासातून आता नवीनच माहिती समोर आली आहे.

किरीट सोमय्या हे राणा दाम्पत्याच्या भेटीला गेले असतांना त्यांच्या गाडीवर संतप्त शिवसैनिकांनी   गाडीवर दगड भिरकले होते. यात ते जखमी झाले होते. सोमय्यांना जखम झाल्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाण्याऐवजी त्याच ठिकाणी गाडीत ठिय्या देण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्या हनुवटी जवळून रक्त येत होतं. या जखमेची मोठी चर्चाही झाली. कालच संजय राऊत यांनी ही जखम बनावट असल्याची टीका केली होती. या पार्श्‍वभूमिवर, सोमय्या यांच्या जखमेबाबत रुग्णालयाचा अहवाल आला आहे.

किरीट सोमय्या यांची तपासणी केल्यानंतर भाभा हॉस्पिटलने मुंबई पोलिसांना अहवाल सादर केला आहे. या रिपोर्टनुसार सोमय्यांच्या जखमेचा कट हा ०.१ सेंटीमीटर इतका असून त्यांच्या हनुवटीवर कोणतीही सूज नाही. तसेच येथून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला नसल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 

Exit mobile version