Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग : गोडावूनवर छापा टाकून ५८ लाख २७ हजारांचा गुटखा व सुगंधित पान मसाला जप्त; दोन जण ताब्यात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील गोडावूनवर अन्न व सुरक्षा विभागाच्या पथकाने गुरुवार २८ मार्च रोजी दुपारी १२ वाजता छापा टाकून ५८ लाख २७ हजार ९०० रुपये किमतीचा सुगंधित पान मसाला, गुटखा, तंबाखू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकूण ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुरुवार २८ मार्च रोजी रात्री ९ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे उमाळा रोडवर गट नंबर २० येथील एका गोडावूनमध्ये बेकादेशीररित्या सुगंधित पान मसाला, गुटखा, तंबाखू यांची साठवणूक करून विक्रीसाठी आणत असल्याची माहिती जळगाव येथील अन्न व सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी शरद पवार यांच्यासह पथकाने नशिराबाद पोलीसांच्या मदतीने गुरुवार २८ मार्च रोजी दुपारी १२ वाजता नशिराबाद गावातील गट नंबर २० मधील एका गोडावूनवर छापा टाकला. या कारवाईत पथकाने एकूण ५८ लाख २७ हजार ९०० रुपये किमतीचा सुगंधित पान मसाला, गुटखा आणि तंबाखू असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिथुन कुमार श्याम भूषण सहानी वय २०, अजय कुमार कापुरी सहानी वय-१८ दोन्ही रा. किशन वाडा, ट्रक चालक अब्दुल जहीर खान रा. मध्य प्रदेश, बलवीर सिंग बग्गा रा. इंदोर, मध्य प्रदेश, गोडावून मालक आणि एकावर (पुर्ण नाव माहित नाही) अशा ६ जणांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात रात्री ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मिथुन कुमार सहानी आणि अजयकुमार सहानी या दोघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घायतळ हे करीत आहे.

Exit mobile version