Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग : धावत्या रेल्वे समोर दोन चिमुकल्यांसह बापाची उडी घेवून आत्महत्या

पाचोरा नंदू शेलकर । चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील २७ वर्षीय तरूणाने कौटुंबिक वादातून आपल्या दोन चिमुकल्यांसह धावत्या रेल्वेसमोर उडी घेवून आत्महत्या केल्याची दुदैवी घटना खळबळजनक घटना नगरदेवळा रेल्वेस्थानकावर घडली.

जितेंद्र दिलीप जाधव रा. बोरखेडा ता. चाळीसगाव हे बापाचे नाव असून चिराग नावाचा ६ वर्षाचा मुलगा व खुशी नावाची ४ वर्षाची मुलगी असे तिघे मयतांची नावे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील जितेंद्र जाधव हा पत्नी पुजा आणि दोन मुलांसह वास्तव्याला आहे.  चाळीसगाव येथील जे.जे. आण्णा टावर या मक्तेदाराकडे जेसीबी चालक म्हणुन काम करत होता. जितेंद्र जाधव आणि त्यांची पत्नी पुजा जाधव यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. दरम्यान जितेंद्र व पुजा यांच्यात अधुन मधुन कौटुंबिक वाद होत असल्याने पुजा हिने तिचा भाऊ भुषण, काका सुधाकर व काकु यांना चाळीसगाव येथे बोलावुन ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये जितेंद्र याचे विरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यांनतर पुजा ही भाऊ, काका आणि काकुंसोबत माहेरी निघून गेल्या जितेंद्र हा दोघ मुलांना सोबत घेऊन बोरखेडा येथे आपल्या मुळगावी आला होता. दरम्यान, रविवार दि. १३ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जितेंद्रने चिराग व खुशी दोन्ही मुलांना सोबत घेतले व गावाबाहेर पडला.

 

दोन्ही मुलांना खावू घातला वडापाव

बोरखेडा येथील बसस्थानकावरील हॉटेलवर त्याने दोघ आवडत्या मुलांना पाववडे खाऊ घातले. त्यानंतर ते दिसेनासे झाल्याने जितेंद्र याचा भाऊ व वडिलांना शंका आल्याने त्यांनी मुलांचा व जितेंद्र याचा शोध घेणे सुरू केले. दरम्यान त्यांनी कजगाव, वाघळी पर्यंत रेल्वेरुळ पिंजुन काढल्यानंतर ते आढळुन आले नाही. तर नगरदेवळा रेल्वेस्थानकावर जवळ त्यांचे नातेवाईक नाना अहिरे हे शोध घेत असतांनाच त्यांच्या नजरेस जितेंद्र, चिराग व खुशी ही दोन तुकडे झालेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्यांनी बोरखेडा येथे घटनेविषयीची माहिती दिली.

 

धावत्या रेल्वेखाली उडी घेवून केली आत्महत्या

सकाळी ११ वाजता सचखंड एक्सप्रेस धावत्या रेल्वेसमोर जितेंद्रने दोन्ही चिमुकल्याने घेतले आणि उडी घेवून आत्महत्या केली. घटनेची माहिती पाचोरा येथील रेल्वे स्थानकावरील रेल्वे पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक शब्बीर शेख, हेड कॉन्स्टेबल मधुसूदन भावसार व प्रविण वाघ यांनी पंचनामा केला. याप्रकरणी रेल्वे पोलीसात अत्महत्येचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे बोरखेडा गावी मोठी शोककळा पसरली आहे.

Exit mobile version