Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग : जुन्या वॉर्ड रचनेनुसारच होणार निवडणुका – विधेयक संमत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका या जुन्या वॉर्ड रचनेनुसारच होणार असून याबाबतचे विधेयक आज संमत करण्यात आले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नवीन वॉर्ड रचना केली होती. यात नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती आणि महापालिकांचा समावेश होता. यात २०११च्या लोकसंख्येनुसार तर २०२१ मधील संभाव्य लोकसभावाढीनुसार वॉर्ड रचना करण्यात आली होती. राज्यात शिंदे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर हा निर्णय रद्द करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. आज हेच विधेयक विधानसभेत संमत करण्यात आले.

आज विधानसभेत याबाबतचे विधेयक संमत करण्यात आले. यावर बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच्या सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, चुकीच्या पध्दतीने ही वॉर्ड रचना करण्यात आली होती. यामुळे आता आधीनुसारच म्हणजे २०१७ सालच्या वॉर्ड रचनेनुसार निवडणुका होणार असल्याचे फडणवीस म्हणाले. अर्थात, आगामी निवडणुका या जुन्या वॉर्ड रचनेनुसारच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version