Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बिगुल वाजला : रावेरातील १३ ग्रामपंचायतीत रंगणार जोरदार मुकाबला !

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली असून या माध्यमातून या सर्व गावांमधील राजकीय वातावरण तापणार असून प्रत्येक ठिकाणी जोरदार मुकाबला होणार असल्याचे दिसून येत आहे.

रावेर तालुक्यातील तेरा ग्राम पंचायतीची सार्वत्रीक निवडणुकांचा बिगुल वाजला आहे.त्यामुळे ग्रामीण भागात निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे.येत्या १६ ऑक्टोबर पासुन उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार असुन.जनतेतुन थेट सरपंचपदाची निवडणुक असल्याने अनेक ग्राम पंचायतांच्या निवडणूका प्रतिष्ठेची होणार आहे.यात चिनावल,पातोंडी,उटखेडा,ग्राम पंचायत तालुक्यात लक्षवेधी ठरणार आहे.

निवडणुक आयोगा कडून राज्यभरात ग्राम पंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.यामध्ये रावेर तालुक्यातील तेरा ग्राम पंचायती आहे.यामध्ये वाघोदा खुर्द; मांगी-चुनवाडे; चिनावल; रोझोदा; उटखेडा; कळमोदा; शिंगाडी-भामलवाडी; खिर्डी बु; पातोंडी-बोहर्डे; थेरोळा; विटवे-सांगवे ग्रुप; आभोडा बु आणि आंदलवाड़ी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

इत्यादी ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहे.यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणे दि १६ ऑक्टोबर ते दि २०ऑक्टोबर माघार घेण्याची मुदत दि २५ऑक्टोबर मतदान दि ५ नोव्हेबर रोजी होणार असून निकाल दि ६ नोव्हेबर जाहीर होणार आहेत. यामुळे या सर्व गावांमधील राजकीय वातावरण आता मोठ्या प्रमाणात तापणार असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version