Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग : देवकरांना दिलासा-जिल्हा बँक निवडणूक लढता येणार

जळगाव प्रतिनिधी |  माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना घरकूल प्रकरणात पाच वर्षे शिक्षा झाली असल्याने त्यांना जिल्हा बँक निवडणूक लढविण्यास मज्जाव करावा या मागणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगितीबाबत दाखल याचिकेच्या सुनावणीसाठी पुढील तारीख २२ नोव्हेंबर देण्यात आली. यामुळे देवकर यांना दिलासा मिळाला असून ते जेडीसीसी निवडणूक लढवू शकणार आहे.

 

काय आहे प्रकरण ?

जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक २१ नोव्हेंबर रोजी होत असून यात महाविकास आघाडीच्या वतीने माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांनी अर्ज दाखल केला आहे. मात्र गुलाबराव देवकर यांना जळगाव येथील बहुचर्चीत घरकूल घोटाळ्यात न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना पाच वर्षे शिक्षा आणि पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. विद्यमान नियमानुसार दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास कोणतीही निवडणूक लढविता येत नाही. मध्यंतरी देवकरांच्या शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र आता ते जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उभे राहिले असतांना त्यांच्या विरोधात उभे असणारे जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि शिक्षण सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. तसेच या संदर्भात पवन ठाकूर यांनी देखील सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर १५ नोव्हेंबर रोजी सुनावणी पूर्ण झाली होती. आज न्यायालयाने काम झाल्यानंतर पुढील दाखल याचिकेच्या सुनवाईसाठी पुढील तारीख २२ नोव्हेंबर देण्यात आली. गुलाबराव देवकर जरी निवडणूक लढवत असले तरी भविष्यात शिक्षा झाल्यास त्यांना जिल्हा बँकेत संचालकपदावर अडचणी निर्माण होवू शकतात.

 

Exit mobile version