Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग : विज कोसळून बैल ठार; सुदैवाने शेतकरी कुटुंब बचावले !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील शेतकऱ्यांच्या गोलबर्डी शिवारातील शेतात वीज कोसळल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीला आले आहे. या घटनेत शेतकऱ्याचे ३५ हजारांचे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील शेतकरी काशीनाथ दौलत पाटील यांची शेतजमीन गोलबर्डी शिवारात असून त्यांनी याच शेतात शेती अवजारे व गुरेढोरे बांधण्याची व्यवस्था केली आहे. काल ०९ जून २०२४ रविवार रोजी शेतात काम करत असतांनाच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. वादळीवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली होती. म्हणून त्यांनी लवकरात, लवकर कामकाज आटोपून सायंकाळी साडेसहा वाजता बैलजोडी बांधून पत्नी, मुलाबाळांसह घराकडे निघाले असतांनाच बांधलेल्या बैलांपासून काही अंतरावर असलेल्या एका छताखाली थांबले असतांनाच अचानकपणे मोठ्याने विचेचा कडकडाट झाला व डोळ्यासमोर लख्ख प्रकाश पडला यावेळी सर्व कुटुंबीयांनी घाबरुन एकमेकांना मिठीत घेतले. तदनंतर थोडे भानावर आल्यावर सर्व सुरक्षित आहेत म्हणून मनोमन देवाचे आभार मानले. कारण बैल बांधल्यावर जर त्याच ठिकाणी सर्व थांबले असते तर मोठा अनर्थ ओढवला असता अशी माहिती शेतकरी काशीनाथ पाटील यांनी दिली.

मात्र याच वेळी बांधलेल्या बैलजोडीकडे पाहिले असता एक बैल जमीनीवर पडलेला दिसून आला म्हणून त्यांनी बैलाजवळ जाऊन पाहिले असता बैल मृत झाल्याचे लक्षात आले. यावेळी त्यांनी आसपास पाहिले असता जवळच असलेल्या हिरव्यागार वृक्षाच्या काही फांद्या जळालेल्या दिसल्या हे पाहून विज पडून बैलाचा मृत्यू झाल्याची खात्री पटली. या घटनेनंतर कुऱ्हाड खुर्द सजेचे तलाठी नकुल काळकर व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश पाटील यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. दरम्यान घटनेबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Exit mobile version