Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग : मेहुणबारे येथे धारदार शस्त्राने एकाचा निर्घृण खून

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मेहुणबारे शहरात एका ४५ वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनमुळे चाळीसगाव तालुका हादरला आहे. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली असून कसून चौकशीला सुरूवात करण्यात येत आहे.

 

दगडू वामन गढरी (वय-४५) रा. मेहुणबारे ता. चाळीसगाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे. मेहुणबारे गावातील गिरणा विद्यालयाजवळ दगडू गडरी यांचा अज्ञात व्यक्तीने गळ्यावर लोखंडी कोयत्याने वार करून निर्घृण खून केला. हा खून कोणत्या कारणावरून झाला हे अद्याप समजू शकले नाही. मानेवर सपासप वार करून मारेकरी पसार झाले आहे. घटनेची माहिती मिळल्यानंतर मेहुणबारे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

 

 

सविस्तर बातमी याच लिंकवर लवकरच मिळेल

Exit mobile version