Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग : लाचखोर पोलीस निरीक्षकासह तिघे एसीबीच्या जाळ्यात

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बायोडिझेलच्या दाखल गुन्ह्यात प्रकरणात सहआरोपी न करण्याच्या मोबदल्यात तीन लाख रूपयांची लाच घेतांना भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड यांच्यासह रायटर आणि खासगी पंटर यांना धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे जळगाव जिल्हा पोलीस प्रशासना मोठी खळबळ उडाली आहे.

(Image Credit Source: Live Trends News)

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार आणि त्याच्या मित्रावर भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात बायोडिझेल प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बायोडिझेल वाहतूक करणारा टँकर पकडून बाजार पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या मोबदल्यात तक्रारदारांकडे ५ लाखांची बाजार पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड यांनी मागणी केली. तडजोडी अंती ३ लाख रूपये देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार धुळे पथकाने मंगळवारी १८ जुलै रोजी सापळा रचला. त्यानुसार पोलीस निरीक्षक गायकवाड आणि रायटर पोलीस नाईक तुषार पाटील यांच्या सांगण्यावरून खासगी पंटर ऋषी दुर्गादास शुक्ला रा. हनुमान वाडी, भुसावळ यांने तक्रारदारकडून ३ लाख रूपयांची लाच स्विकारली. त्याचवेळी धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी तिघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

यांनी केली कारवाई
धुळे लाचलुचपथ विभागाचे पोलीस उपअधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. संतोष पावरा, पो.कॉ. रामदास बारेला, पो.कॉ.चालक सुधीर मोरे यांनी केली.

Exit mobile version