Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग : आयुष प्रोकॉन कंपनीला भीषण आग

साकेगाव, ता. भुसावळ-प्रवीण पाटील | राष्ट्रीय महामार्गा क्रमांक-६ च्या चौपदरीकरणाचे काम करणार्‍या आयुष प्रोकॉन कंपनीच्या कार्यालयास आज भीषण आग लागल्याचे वृत्त आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा आणि आशिया महामार्ग क्रमांक-४६ वरील तरसोद ते चिखली या भागाचे चौपदरीकरणाचे काम आयुष प्रोकॉन या कंपनीने केले आहे. या कंपनीचे मुख्यालय साकेगाव जवळ असणार्‍या तिघ्रे ( ता. जळगाव) येथील शिवारात असून येथूनच पूर्ण कामांचे नियोजन करण्यात येत होते.

दरम्यान, आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कंपनीला भीषण आग लागली. काही क्षणातच आगीचे लोट दिसू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते.

Exit mobile version