Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकिंग : शॉर्टसर्किटमुळे साखरे गावातील 4 घरांना भीषण आग; लाखोंचे नुकसान

धरणगाव-लाईव्ह ट्रेन्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील साखरे गावात शॉर्टसर्किट झाल्यामुळे अचानक ४ घरांना भीषण आग लागल्याची घटना सोमवारी १८ डिसेंबर रोजी घडली आहे. या लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचा घरातील कापूस जळून खाक झाला आहे. धरणगाव नगरपालिकेचा अग्निशमन बंबाने ही आग विझवण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील साखरे गावात सोमवारी १८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे घरात ठेवलेल्या कापसाला आग लागली. घराच्या बाजूला असलेल्या इतर ३ घरांना देखील आग लागल्याने घरातील सामानासह शेती उपयोगी असलेले वस्तू जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर थोड्या वेळाने धरणगाव नगरपालिकेचा अग्निशमन बंब देखील दाखल झाला. या बंबाच्या मदतीने लागलेली आग विझवण्यात आले आहे। या आगीत शेतकऱ्यांच्या घरात ठेवलेला कापूस जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचा मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या संदर्भात धरणगाव पोलिसात अद्याप कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही

 

या आगीत यांचे झाले नुकसान

साखरे गावातील शेतकरी रमेश वना पाटील, विकास वना पाटील, स्वप्निल अमृतकर आणि तिरुणाबाई वना पाटील या ४ जणांच्या घराला आग लागल्याने घरातील काही रोकड सामान आणि कापूस जळून खाक झाला आहे.

Exit mobile version