Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

Breaking : अरे बापरे…जिल्ह्यात पुन्हा ११ नवीन कोरोना बाधीत

जळगाव प्रतिनिधी । आज सकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात ११ नवीन कोरोना बाधीत आढळले असून यातील सहा जळगाव तर चार हे भुसावळचे रूग्ण असून एक अमळनेरचा आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोना बाधितांबाबत माहिती जाहीर केली आहे. यानुसार-जळगाव, अमळनेर, भुसावळ येथे स्वॅब घेण्यात आलेल्या 70 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 59 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर अकरा व्यक्तींचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये अमळनेर येथील एक 58 वर्षीय महिला, भुसावळ येथील चार ( 32, 50, 52, 64 वर्षीय) पुरूषांचा तर जळगाव शहरातील पवननगर व इतर भागातील सहा (यामध्ये 14 वर्षीय मुलगी, 38, 55, 70 वर्षीय महिलांचा तर 46 व 70 वर्षीय पुरूषांचा) व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 174 झाली आहे. यापैकी 20 रूग्णाचा मृत्यू झाला आहे तर तीन व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version