Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावात घराचे कुलूप तोडून रोकड लंपास!

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । बंद घराचे कडी कोंडा तोडून अज्ञात इसमाने कपाटातील अठ्ठेचाळीस हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना शहरातील महाराणा प्रताप हौसिंग सोसायटीत घडली असून याबाबत शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिराने फिर्याद दाखल करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की, कविता हरेंद्र निकम (वय- ४२ रा. महाराणा प्रताप हौसिंग सोसायटी ता. चाळीसगाव) येथे पती व दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. पती हरेंद्र निकम हे राष्ट्रीय विद्यालय चाळीसगाव येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. दिर रविंद्र निकम (रा. मुक्ताईनगर) यांचे दि. २२ मार्च रोजी कोरोनाने मृत्यू झाला अशी माहिती कळताच घराला कुलूप लावून परिवारासह मयतांवर गेले. दरम्यान पती हरेंद्र निकम यांना कोरोनाची बाधा झाल्याने काही दिवस तेथेच राहण्याचे त्यांनी ठरवले. मात्र दि. ११ एप्रिल रोजी शेजारील राजू बडगे यांनी घराचे कडी कोंडा तोडून कोणीतरी घरात अस्ताव्यस्त केल्याची माहिती हरेंद्र निकम यांना फोनद्वारे कळवली. त्यावर कविता हरेंद्र निकम यांनी घरी येऊन पाहणी केली असता कपाटातील ४८, ००० हजार रोकड अज्ञात इसमाने चोरून  नेल्याचे लक्षात येताच शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिराने फिर्याद दाखल केली आहे. दि. २२ मार्च सकाळी ६ वाजेपासून ते ११ एप्रिल सकाळी ७ वाजे पावेतो हि घटना घडली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पो.ना.744/ शैलेंद्र पाटील हे करीत आहेत.

 

Exit mobile version