Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पारोळ्यात उद्यापासून होणार ब्रह्मोत्सव सुरुवात

पारोळा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दोन वर्षाच्या कोविड काळानंतर उद्या सोमवार दि. २६ सप्टेंबरपासून बालाजी महाराजांच्या नवरात्रोत्सव म्हणजे ब्रह्मोत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्यात येणार आहे.

 

सालाबाद प्रमाणे यंदाही बालाजी महाराजांच्या नवरात्रोत्सव हा ब्रह्मोत्सव म्हणून दि. २६ सप्टेंबरपासून ते दि. १० ऑक्टोबरपर्यंत साजरा करण्यात येणार आहे. पारोळा येथील प्रभू बालाजी यांचा नवरात्रोत्सव हा शहरासह तालुक्यात ब्रहमोत्सव म्हणून साजरा करण्यात येतो. मागील दोन वर्षांपासून या उत्सवावर कोरोनाचे सावट होते म्हणून हा उत्सव साजरा करण्यात आला नव्हता. परंतु या वर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत संस्थानच्या वतीने देण्यात आली.

 

यावर्षी हा उत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदा दि. २६ सप्टेंबरपासून ते अश्विन दि. १० ऑक्टोंबर पर्यंत ब्रह्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे याप्रसंगी विविध विषयांवर चर्चा होऊन पुढील नवरात्र उत्सव व रथोत्सव हा शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडावा अशी विनंती बालाजी संस्थांच्या वतीने विश्वस्त अध्यक्ष श्रीकांत शिंपी यांनी केली याप्रसंगी बालाजी संस्थांच्या वतीने संस्थानाच्या माध्यमातून 30 रुपयात प्रसादाची (जेवणाची) सोय केली आहे. तसेच वस्तू संग्रहालय भक्तनिवास अद्यावत हॉस्पिटल संस्कृतीत हाल प्रसादालय कल्याण कट्टा असे संयुक्त वास्तू उभारण्याचे काम सुरू आहे तसेच भावी भक्तांसाठी यासाठी सरळ हाताने मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. येत्या काही काळात संस्थान च्या वतीने विविध प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देणार आहोत असे हि यावेळी संस्थान च्या बालाजी संस्थानचे अध्यक्ष श्रीकांत शिंपी यांनी सांगितले. यावेळी संस्था संस्थांचे विश्वस्त केशव क्षत्रिय रावसाहेब भोसले अनिल गुजराती प्रकाश शिंपी संजय कासार, प्रमोद शिरोळे, अरुण वाणी, दिनेश गुजराती व दर्पण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.

 

Exit mobile version