Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पळासखेडे येथील खून प्रकरणातील प्रियकरला अटक; भडगाव पोलीसांची कारवाई

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला प्रियकरच्या मदतीने पैसे देण्याचा बहाणा करून पळासखेडे रस्त्यावर अपघाताचा बनाव करून खून केल्याची घटना ३१ मार्च रोजी मध्यरात्री २ वाजता समोर आले आहे. यात पत्नीला अटक करण्यात आली होती. यातील फरार प्रियकर राजेंद्र शेळके महाराज रा. आळंदी पुणे याला वाहनासह भडगाव पोलीसांनी अटक केली आहे. दोघांवर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, याबाबत अधिक असे की, भडगाव तालुक्यातील पळासखेडे येथे किशोर पाटील हे व्यक्ती आपल्या पत्नी पुष्पा पाटील हिच्या सोबत वास्तव्याला होते. दरम्यान किशोरच्या पत्नीचे राजेंद्र शेळके महाराज रा. आळंदी जि.पुणे यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. यामुळे अनेक वेळा या कारणावरून किशोर पाटील आणि पत्नी पुष्पा पाटील यांच्यात वाद होत होते. दरम्यान, अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्याचे पत्नी पुष्पा पाटील हिने ठरविले. त्यानुसार प्रियकर राजेंद्र शेळके महाराज याच्या मदतीने नियोजन केले. यात प्रियकर राजेंद्र शेळके याने पैसे देण्याचा बहाणा करून किशोर पाटील याला पळासखेडे ते तरवाडे रोडवर बोलावून घेतले. त्यानुसार किशोर पाटील हा शनिवार ३० मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता घरातून निघून गेला. त्यानुसार आगोदरच दबा धरून बसलेले राजेंद शेळके यांने अपघाताचा बनाव करून किशोर पाटील याला ठार केले. हा प्रकार रविवारी ३१ मार्च रोजी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आला होता.

याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मयताची पत्नी पुष्पा पाटील हीला पोलीसांनी अटक केली होती. तर मारेकरी राजेंद्र शेळके महाराज हा वाहन क्रमांक (एमएच १२ एमएस ००१०) सह अटक केली आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पेालीस अधिक्षक कविता नेरकर-पवार, सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, पोउनि शेखर डोमाळे, सहाय्यक फौजदार संजय काळे, रमण कंडारे, राजेंद्र पाटील, चालक अनिल अहिरे, पोहेकॉ निलेश ब्राम्हणकर, भूषण शेलार, भूषण मोरे, पो.कॉ. संदीप सोनवणे, संभाजी पाटील यांनी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख हे करीत आहे.

Exit mobile version