Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरधाव डंपरच्या धडकेत मुलगा ठार

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील हिवरखेड रोडवर उभा असलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलाला भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात मुलगा जागीच ठार झाल्याची घटना घडली. जामनेर पोलीस ठाण्यात डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवकास आकाश दावत (वय-१४) रा. पाटल्या ता. झिरण्या जि. खरगोन मध्‍यप्रदेश ह.मु. स्टोन क्रेशर मशीन गोंडखेव शेत शिवार, जामनेर हा मुलगा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होता. बुधवार ६ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास हिवरखेडा रोडवरील रस्त्यावर खेळत असतांना  समोरून भरधाव वेगाने येणारा डंपर (एमएच १९ झेड २९१२) ने मुलाला जोरदार धडक दिली. या धडकेत मुलगा जागीच ठार झाला. याबाबत डंपर चालक नारायण नथ्थू चौधरी रा. गोंडखेल ता. जामनेर याच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र बिऱ्हाडे करीत आहे.

Exit mobile version