Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोढरे येथे ग्रामीण व शहरी कबड्डी स्पर्धेचे मंगेश चव्हाण यांच्याहस्ते उदघाटन (व्हिडीओ)

mangesha dada

 

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील बोढरे येथे आज दि.6 ऑगस्ट रोजी साई सहारा क्रीडा मंडळातर्फे ग्रामीण व शहरी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, यास्पर्धेचे उदघाटन युवा नेते मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

समाज जीवनात खेळाडू वृत्ती अंगी जोपासली जावी, मन आणि शरीर निरोगी शरीर रहावे, यासाठी या स्पर्धा घेण्यात येत असून यात सहभागी झालेल्या संघांना तालुक्याचे युवा नेते मंगेश चव्हाण यांनी शुभेच्छा देवून स्वतः त्यांच्यासोबत कबड्डी खेळून स्पर्धकांचा उत्साह वाढवला आहे. या कबड्डी स्पर्धेचे यंदा ३ रे वर्ष असून स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत. स्पर्धा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी व तरुणांनी मोठी गर्दी होत आहे.

यावेळी सरपंच साईदास जाधव, उपसरपंच चरणदास जाधव, ग्रा.स. पितांबर जाधव, सखाराम जाधव, नामदेव गोपाळ, माजी ग्रा.स. उत्तम राठोड, नगरसेवक भास्कर पाटील, माजी नगर सेवक प्रभाकर चौधरी, भाजप सरचिटणीस प्रा. सुनील निकम, माजी पं.स सतिष पाटे, योगेश खंडेलवाल, जगदीश चव्हाण, मा.ग्रा.स.चेनसिंग राठोड, भीमराव जाधव, अर्जुन राठोड, गुलाब राठोड, पंडित चव्हाण, उत्तम जाधव, सुभाष जाधव, गोटीराम सोनार आदी उपस्थित होते.

Exit mobile version