Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुचाकी चोरी प्रकरणातील दोन्ही संशयित आरोपींची कारागृहात रवानगी

जळगाव प्रतिनिधी । शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेळ्या भागातून चोरी केलेल्या पाच दुचाकींसह दोन संशयित आरोपींना तांबापुरा येथून शहर पोलीसांनी अटक केली होती. आज न्यायालयात हजर केले असता कारागृहात रवानगी केली आहे.

शाहरुख जहूर खाटीक (वय-२५, रा.तांबापुर) आणि फारुख शेख मुस्तफा (वय-३२,रा. राजा कॉलनी) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे.  शहर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे वेगवेगळे दोन गुन्हे दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस कॉन्स्टेबल अक्रम शेख यांच्याकडे गुन्ह्याचा तपास होता.  दरम्यान, पोहेकॉ अक्रम शेख यांनी गुन्ह्याच्या तपासात गेल्या दोन दिवसांपासून संशयित आरोपी शोधात होतो. दोन संशयित आरोपी शाहरुख जहूर खाटीक (वय-२५, रा.तांबापुर) आणि फारुख शेख मुस्तफा (वय-३२,रा. राजा कॉलनी)  तांबापूऱ्यातील असल्याचे निष्पन्न झाले. काल सोमवारी १४ जून रोजी सकाळी शहर पोलीसांनी तांबापूरा येथील शाहरुख जहूर खाटीक (वय-२५, रा.तांबापुर) आणि फारुख शेख मुस्तफा (वय-३२,रा. राजा कॉलनी) या दोघांना राहत्या घरातून अटक केली. दोघांची चोरीच्या पाच दुचाकी रावेर तालुक्यातून काढून दिल्या आहे. दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आज दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोघांची कारागृहात रवानगी केली आहे.

 

Exit mobile version