Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोरुबहाद्दर कप्तान तोंडावर आपटले – मनसे

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे दोन उमेदवार मैदानात होते. त्यात भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले तर शिवसेनेचे संजय पवार यांच्या पराभवानंतर बोरुबहाद्दर कप्तान तोंडावर आपटले अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटद्वारे केली आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेनेने अपक्ष उमेदवार कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना पाठींबा न देता कोल्हापूर मधूनच संजय पवार यांना उमेदवारी दिली. तर भाजपने धनंजय महाडिक यांना उभे केले. या निवडणुकीत जोरदार लढत असल्याने सर्वांचेच लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. त्यात कोल्हापूरच्या आता धनंजय महाडिकांनी बाजी मारली. महाडिक यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीसह शिवसेनेला मोठा धक्का बसला असून या निकालानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांना कप्तान तोंडावर आपटले असा टोला ट्वीटद्वारे लगावला आहे.

Exit mobile version