Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाल येथे विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर बॉर्डर बैठक

pal

रावेर प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्र व मध्य प्रदेश पोलीस अधिका-यांची डिवायएसपी नरेंद्र पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाल येथील शासकीय विश्राम गृहावर बॉर्डर बैठक (दि.२६) घेण्यात आली.

यावेळी बैठकीत दोघे महाराष्ट्र-मध्य प्रदेश सिमालगत आरोपींची माहिती दोघ राज्यांच्या पोलिस अधिका-यांनी जाणून घेतली. विधानसभा निवडणूक कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि सहकार्य करण्याचे आश्वासन या बॉर्डर पोलीस बैठकीत देण्यात आले आहे. या बैठकीला रावेर पो.नी रामदास वाकोडे, रावेर भगवानपूरा पो.नि. चौहान, पो.स्टे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक बामनिया, लालबाग पो.स्टे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक सिंध्या निंबोला, पो.स्टे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक मोरे, शिरवेल चौकी,भगवनपुरा पो.स्टे एएसआय सुरेश शर्मा यांच्यासह आदी पोलिस अधिकारी या निवडणूक बॉर्डर बैठकीला उपस्थित होते.

Exit mobile version