Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बुस्टर रथावर स्वार होऊन देवेंद्र फडणवीस सभास्थळी दाखल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बुस्टर रथावर स्वार होऊन भाजपच्या सभेच्या ठिकाणी दाखल झाले आहेत.

आज औरंगाबाद येथे राज ठाकरे यांची सभा होत असतांनाच मुंबईत भाजपची बुस्टर सभा होत आहे. या सभेच महाविकास आघाडीच्या विरूध्द जोरदार हल्लाबोल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या सभेच्या आधी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बुस्टर रथावर स्वार होऊन सभास्थळी आले.

फडणवीस यांचा हा रथ फुलांनी सुशोभीत करण्यात आला असून त्यांच्या सोबत भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर आता सभा सुरू झाली असून आमदार आशिष शेलार यांनी आपल्या भाषणातून महाविकास आघाडी सरकारला टार्गेट केले आहे.

Exit mobile version