Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शॉर्टसर्किटमुळे उर्दू शाळेतील पुस्तके व बेंच जळून खाक

Photo School

जळगाव (प्रतिनिधी)। शिरसोली रोडवरील डिमार्टच्या समोरील रहीम नगरमधील एका उर्दू शाळेच्या एका खोली शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची घटना पहाटे 5 वाजेच्या सुमारास घडली असून या आगीत बॅचसह, विद्यार्थ्यांचे पुस्तके आणि शाळेतील कागदपत्र जळून खाक झाल्याची माहिती विश्वसनिय सुत्राकडून मिळाली.

पहाटे पाच वाजेची घटना
याबाबत महिती अशी की, डीमार्ट समोरील रहीम नगर येथे असलेल्या युनिक प्रायमरी स्कूल (उर्दू शाळा) मध्ये एका बंद खोलीत शॉर्टसर्किटमुळे वर्गातील लाकडी बॅचसह विद्यार्थ्याचे पुस्तके आणि शाळेच्या कार्यालयीन कामकाजाचे कागदपत्र जळाले. ही घटन पहाटे 5 वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती गल्लीतील नागरीकांना समजल्यावर आग विझविण्यास मदत केली.

आकोडा टाकून  विजेचा पुरवठा
शाळेला मिटर नसल्याने इलेक्ट्रीक खंब्यावर आकडा टाकून विज पुरवठा होत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. घटना पहाटेच्या सुमारास घडली मात्र शाळा चालू असतांना ही घटना घडली असती तर लहान मुलांचे काय झाले असते याविषयावरून परीसरात चर्चा रंगली होती.

शाळेत मुलभूत सुविधा नाही
इब्राहिम मश्जितीजवळील युनिक प्रायमरी उर्दूशाळेत इयत्ता पहिली ते दहावीचे वर्ग भरविले जाते. शाळेत विद्यार्थ्यांना लागणार्‍या मुलभूत सुविधा नसल्याचीही माहिती नागरीकांकडून मिळाली आहे.

Exit mobile version