Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे तहसील कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने आज जळगाव तालुकास्तरीय रॅली व बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. ही रॅली शहरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानापासून ते जळगाव तहसील कार्यालयावर काढण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तालुका प्रशासनाला देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एससी, एसटी, व्हीजेएनटी, एसबीसी, ओबीसी या सामाजिक समूहांना पदोन्नतीत आरक्षण नाकारणाऱ्या शासन निर्णयाच्या विरोधात हे आंदोलन होत आहे. तसेच मागासवर्गीय आरक्षण, कामगार, कर्मचारी, शेतकरी, महिला आणि विद्यार्थी धोरणाच्या विरोधातही संघटनेच्या वतीने राज्यातील ३६ जिल्ह्यात आंदोलन होत आहे. 

राज्यात चार टप्प्यात आंदोलन होत आहे. ७ आणि १२ जुलैला दोन टप्पे झाले. आता १९ जुलैला तालुकास्तरीय रॅली व शासकीय कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येत आहे. तर २६ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

या आंदोलनात सुमित्र अहिरे, किशोर नरवाडे, नामदेव कोळी, रविंद्र ठाकरे, रमण बाविस्कर, हिमांशू बाविस्कर, चारूदत्त सोनवणे, डी.बी. बाविस्कर, मोहनचंद्र सोनवणे, प्रितम बाविस्कर, बाळकृष्ण नेमाडे, दुर्गेश बाविस्कर, मुरलीधर तायडे, रमेश शिरसाइ, रमेश सोनवणे, मदन शिरसाठ, अमजद रंगरेज, शे.रहिम शेख इब्राहिम, शेख इरशान शेख कैसर, फरदीन खान, नियाजोद्दिन अलाउद्दीन शेख , सुकलाल पेंढारकर, जयश्री वानखेडे, विष्णू वानखेडे, विजय सुरवाडे, किरण निकम, अरूण संध्यान, नरेंद्र कांबळे, गोपाल राहरे यांच्यासह आदी उपस्थित होते.

Exit mobile version