Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोदवड येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकावर गुन्हा

Rape Child crime

बोदवड प्रतिनिधी । येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात पोस्को कायद्यानुसार बोदवड पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्या प्रकरणी बाललैगिक अपराध संरक्षण कायद्यानुसार (पोस्को) १२ प्रमाणे गुन्हा दाखल यात आरोपी ८ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तहसील कार्यालया समोरील रस्त्यावर आरोपी मोहन रामधन शहापुरे रा. बोदवड याने फीर्यादी पिडीत मुलीचा अचानक हात धरुन वाइट उद्देशाने ‘तु मला खूप आवडतेस माझ्या सोबत चालते का’ असे बोलून फीर्यादी पिडीत मुलीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. वेळोवळी इशारे करून पाठलाग केला आणि तुझा साखरपुडा मोडून टाकेल, अशी धमकी दिली. अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी मोहन रामधन शहापुरे यांच्या विरोधात बोदवड पोलीस ठाण्यात पोस्को १२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोउनि भाईदास मालचे पोहेकॉ संदीप वानखेडे करीत आहे.

Exit mobile version