Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ओबीसी प्रभागांमधील निवडणुकांना स्थगिती ! बोदवडचा समावेश

मुंबई प्रतिनिधी | सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण रद्द करण्याच्या दिलेल्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या राज्यातील १०५ नगरपंचायती, दोन जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीत ओबीसी राखीव असणार्‍या जागांवरील निवडणूक रद्द करण्याची घोषणा केली आहे. यात जिल्ह्यातील बोदवडचा समावेश आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारनं स्थानिक स्वराज संस्थांमधील ओबीसी आरक्षणासाठी जारी केलेल्या अध्यादेशाला स्थगिती दिली आहे. दरम्यान, भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि १०५ नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या निवडणुकांवर देखील या निर्णयाचा परिणाम होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांनी ओबीसी प्रभागातील निवडणुकीला स्थगिती देण्यात आल्याची माहिती दिली आहे.

भंडारा गोंदिया जिल्हा परिषद, त्या अंतर्गत येणार्‍या पंचायत समित्या आणि ३२ जिल्ह्यातील १०५ नगरपंचायतीमधील निवडणुकांसाठी ज्या जागांवर ओबीसी प्रवर्ग राखीव करण्यात आले होते त्या जागांवरील निवढणूक स्थगित करण्यात आलीय. ओबीसी प्रभाग वगळता इतर जागांवरील निवडणुकीसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार आहे.

दरम्यान, बोदवड नगरपंचायतीसाठी सुध्दा २१ डिसेंबर रोजी निवडणूक होत असून येथे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. मात्र निवडणूक आयुक्तांच्या निर्देशानुसार येथील ओबीसी आरक्षण असणार्‍या जागांवर निवडणूक होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, दुसरीकडे राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत ओबीसी प्रभागच नव्हे तर संपूर्ण निवडणूक प्रतिक्रयांनाच स्थगिती मिळण्याची देखील शक्यता आहे. यामुळे आता सर्वांचे लक्ष मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णयाकडे लागले आहे.

Exit mobile version