Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोदवडच्या चार पं.स. गणांसाठीचे आरक्षण जाहीर

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पंचायत समितीच्या चार जागांसाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आले.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार आज जिल्ह्यात ठीक ठिकाणी पंचायत समितीच्या गणांसाठीची आरक्षण सोडत जाहीर झाली. बोदवड तहसील कार्यालयाच्या हॉल मध्ये सोडत जाहीर करण्यात आली. या ठिकाणी निवडणूक अधिकारी गोविंद दानेज, उपजिल्हाधिकारी रोहयो सहाय्यक प्रशांत कुलकर्णी, पुरवठा अधिकारी जळगाव बोदवड; नायब तहसीलदार सुर्यवंशी, बिडीओ हेमंत कुमार कातेपुरे. दिपाली ढोले निवडणूक शाखा यांची उपस्थिती होती.

बोदवड तालुक्यातील प.स.गण आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.

१) नाडगाव गण- अनुसूचित जाती महिला राखीव
२) साळशिंगी गण- ओ बि सी महिला
३) मनूर बुद्रुक गण-सर्व साधारण
४) शेलवड गण – सर्व साधारण

यामुळे आता तालुक्यात खर्‍या अर्थाने निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

Exit mobile version