Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बस चालकाच्या प्रसंगावधानाने टळला अपघात

बोदवड प्रतिनिधी । धावणारच्या एसटीचे स्टेअरिंग अचानक लॉक झाले असतांनाही चालकाने प्रसंगावधान दाखविल्याने अपघात टळला. ही घटना बोदवड तालुक्यातील सुरवाडे गावाच्या जवळ घडली.

याबाबत वृत्त असे की, जळगाव-बोदवड बस (क्रमांक एमएच २० बीएल १५९६) घेऊन चालक जगदीश देवचंद लोखंडे (वय ३७) हे येथून जळगावला जाण्यासाठी निघाले. दुपारच्या सुमारास सुरवाडेमार्गे जात असताना सुरवाडे खुर्द येथे प्रवाशांना उतरवण्यासाठी बसचा वेग हळू करण्यासाठी गाडीचा ब्रेक दाबला असता अचानक बसचे स्टेअरिंग लॉक झाले. यामुळे गाडी धडकून अगघात होण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र चालकाने तातडीने ब्रेक दाबत गिअर बदलून वेग कमी केला. यामुळे गाडी अचानक रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकली. त्यामुळे बसच्या दर्शनी भागाची काच फुटून नुकसान झाले. मात्र यात चालकाच्या प्रसंगावधानाने ४५ प्रवाशांपैकी कुणीही जखमी झाले नाही.

Exit mobile version