Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अतिक्रमण हटवा : शिरसाळेकरांची तक्रार

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील शिरसाळा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अतिक्रमण हटविण्यात यावे यासाठी ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे.

तालुक्यातील शिरसाळा ग्राम पंचायतीला गावातील वार्ड क्रमांक तीन मधील नागरिकांनी तक्रार अर्ज दिला आहे. या अर्जात नमूद केले आहे की गाव रस्त्यावर टपरी ठेऊन अतिक्रमण केले आहे. थेट रस्त्यातच अतिक्रमण येत असल्याने लोकांना गाडी बैल, मालाचे जड वाहन येण्या-जाण्यासाठी त्रास होत आहे. या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने संबंधित टपरी धारकांना ग्राम सेवक व सरपंच यांनी सात दिवसाच्या आत अतिक्रमण काढावे अशी मागणी यात करण्यात आलेली आहे.

दरम्यान, ग्रामपंचायतीने कार्यवाही न केल्यास पोलीस कारवाई करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आलेला आहे. या संदर्भातील अर्ज नामदेव माधव शेकोकर व पंडित कृष्णा पाटील यांनी दिला आहे. तर पंडित कृष्णा पाटील यांनी सुध्दा ग्राम पंचायतीला १३ सप्टेबर रोजी अर्ज दिला आहे की शिरसाळा येथील वार्ड क्रमांक तीन मध्ये असलेले रस्त्यावरील दोन्ही बाजूचे अतिक्रमण सुरुवाती पासून ते शेवट पर्यंत हटविण्यात यावे अशी मागणी ग्रामसेवक व गट विकास अधिकारी पंचायत समिती बोदवड मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांच्या कडे केली आहे,. पण अद्याप पर्यंत सरपंच व ग्रामसेवक यांनी कोणतेही कारवाई करताना दिसत नसल्याचे दिसत आहे.

एकंदरीत शिरसाळा गावात गट नंबर सहा व गट नंबर नऊ मध्ये अनेक नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. यात काहींनी तलावाच्या परिसरात संपादित केलेल्या जागेवर पक्के बांधकाम केलेले आहे. काही लोकांकडून पैसे घेऊन अतिक्रमण पक्के करण्यासाठी चार ते पाच हजार रुपये घेतल्याची चर्चा आहे. तर, गावात माझे एकट्याचेच अतिक्रमण नसून असे कित्येक लोकांचे सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. राजकीय द्वेषापोटी आम्हाला नोटीस बजावण्यात आली आहे. आमच्याशी भेद भाव केला जात असून पदाधिकार्‍यांचे मात्र अतिक्रमण काढण्यास किंवा नोटीस देण्यास ग्रामसेवक विस्तार अधिकारी ( ग्रा.प.विभाग ) बोदवडचे गटविकास अधिकारी पदाधिकार्‍यांना(ग्रा.प. सदस्यांचे ) पद वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे असे पंडित कृष्णा पाटील यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले.

Exit mobile version