Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत जिल्हा संघाची निवड करण्यासाठी उद्या निवड चाचणी

बोदवड प्रतिनिधी । औरंगाबाद येथे आयोजीत राज्यस्तरीय पॉवर लिप्टींग स्पर्धेत जिल्हा संघाची निवड करण्यासाठी बोदवड येथे उद्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्युनिअर , ज्युनिअर, सीनियर पुरुष व महिला गटातील राज्य स्पर्धेचे आयोजन ५ ते ६ फेब्रुवारी रोजी साई जिम्नॅशियम छावणी, औरंगाबाद येथे करण्यात आले आहे. त्यात जळगाव जिल्हा पॉवर लिफ्टिंग संघ सहभागी होणार आहे त्यासाठी जिल्हा निवड चाचणी ३ रोजी येथील न.ह. राका हायस्कूलमध्ये सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी निवड चाचणी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अनंत कुलकर्णी, सचिव संजय निकम, प्रदीप साखरे,आर.के. तायडे, संजीव वाढे, सिद्धार्थ मेढे यांनी केले आहे.

Exit mobile version