Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रस्ता दुरुस्त न केल्यास सरणावर झोपणार !

बोदवड प्रतिनिधी । बोदवड ते मलकापूर या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून याची दुरूस्ती करावी अन्यथा सरणावर झोपून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रमोद धामोडे यांनी तहसीलदार जितेंद्र कुवर यांना निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे की, बोदवड-मलकापूर या रस्त्यावर दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम मंजूर झाले आहे. तरीदेखील संबंधित ठेकेदार व प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर बरेच अपघात झाले आहेत. पोलिस प्रशासन कोरोनाच्या परिस्थितीत काम करत असल्याने वाहनधारकांनी तक्रारी दाखल केलेल्या नाहीत. तहसीलदारांनी स्वत: या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून जनतेला न्याय द्यावा. बोदवड-मलकापूर रस्त्यावर अपघात झाल्यास त्यास प्रशासनाला जबाबदार धरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत आधी निवेदन आपल्याकडे दिलेले असतानाही आपल्या स्तरावरून कोणतीच कार्यवाही झाल्याचे दिसत नाही. यामुळे रस्ता त्वरित दुरुस्त करावा अन्यथा ६ जानेवारी रोजी खंडेलवाल पेट्रोल पंपासमोर उपोषणाचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

Exit mobile version