Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अरेच्चा… तहसीलच्या आवारातच सरणावर झोपून आमरण उपोषण

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे कायमस्वरूपी तहसीलदार मिळावा या मागणीसाठी एका सामाजिक कार्यकर्त्याने चक्क तहसील कार्यालयाच्या आवारातच सरणावर झोडून आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे.

याबाबत वृत्त असे की, बोदवड येथे तहसीलदारपद रिक्त असून त्या मुळे नागरिकांना त्रास होत आहे वारंवार मागणी होऊनही तहसीलदार नियुक्ती न झाल्याच्या निषेधार्थ येवती येथील रहिवासी प्रमोद धामोडे यांनी आज १२ वाजेपासून सरणावर झोपून आमरण उपोषणाला प्रारंभ केला.

दरम्यान, धामोडे यांनी आधी निवेदन देऊन तहसीलदारांच्या नियुक्तीची मागणी केली होती. या निवेदनात म्हटले होते की ग्रामीण भागातील विविध समस्यांसाठी नागरीकांना तहसिल कार्यालयामध्ये काम असते. सदरचे काम करीत असतांना सदर ठिकाणी पुर्णवेळ तहसिलदार नसल्यामुळे वृद्ध, अपंग व निराधार नागरीकांना तसेच पुरवठा शाखेमध्ये विविध कामांसाठी, पंतप्रधान सन्मान योजने संदर्भात तक्रार करणेसाठी सक्षम असे तहसिलदार नसल्यामुळे बोदवड तालुक्यांतील नागरीकांचे नुकसान होत आहे. याबाबत बर्‍याच वेळा विविध पक्षामार्फत तसेच संघटनांमार्फत निवेदने देण्यात आलेली आहेत असे प्रसार माध्यमांव्दारे समजते. परंतु त्याबाबत वरीष्ठ पातळीवरून कोणत्याही प्रकारची दखल घेवून कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही यामुळे आपण आमरण उपोषण करणार असल्याचा त्यांनी इशारा दिला होता.

या निवेदनावर कोणतीही कार्यवाही करण्यात न आल्यामुळे प्रमोद धामोडे यांनी आज समोवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी दुपारी१२ वाजेपासून बोदवड तहसिल कार्यालय या ठिकाणी सरण रचले. पूर्णवेळ तहसिलदार यांची नियुक्ती होत नाही तो पर्यंत सरणावर झोपून त्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

Exit mobile version