Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोदवड येथे सीसीआयच्या कापूस खरेदीस प्रारंभ

बोदवड प्रतिनिधी । येथे सीसीआयतर्फे कापूस खरेदीस प्रारंभ झाला असून खासदार रक्षा खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत याचे उदघाटन करण्यात आले.

नाडगाव रोडवरील सिद्धिविनायक कोटेक्स भारतीय कपास निगम (सीसीआय)तर्फे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. याचे उदघाटन खासदार रक्षा खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शेतकर्‍यांनी कापूस वाळवून व स्वच्छ करून विक्रीस आणावा, केंद्राचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा व शेतकर्‍यांना जास्तीत जास्त सहकार्य करून कापूस खरेदी करावी अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. पहिल्यांदा मनूर येथील शेतकरी विनोद शांताराम मालठाणे यांचा कापूस खरेदी करण्यात आला असून त्यांना प्रति क्विंटल ५७२५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

या कार्यक्रमाला तहसीलदार हेमंत पाटील, निवृत्ती पाटील, किशोर गायकवाड, गजानन खोडके, ईश्‍वर जंगले, आनंदा पाटील, मधुकर राणे, अनिल वराडे, शांताराम चौधरी, रामदास पाटील, भीमराव पाटील, सुरेंद्र पाटील, दीपक वाणी, कैलास खंडेलवाल, सुनील पाटील, दीपक माळी, सुनील गुप्ता, राहुल बरडिया, सचिव विशाल चौधरी आदी उपस्थित होते.

Exit mobile version